बिळाशी एकाच पवसात नवीन रस्ता वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:18+5:302021-05-06T04:29:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिळाशी (ता.शिराळा) येथे विटा-कोकरूड रस्त्याचे डांबरीकरण असून, एकाच पावसाने डांबरीकरणाचा भाग खचून वाहून गेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिळाशी (ता.शिराळा) येथे विटा-कोकरूड रस्त्याचे डांबरीकरण असून, एकाच पावसाने डांबरीकरणाचा भाग खचून वाहून गेले आहे, तसेच बाजूची खडीही वाहून गेली आहे. असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी दलित महासंघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
बिळाशी येथे दि. ४ मे रोजी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु बुधवारी दुसऱ्या दिवशी डांबरीकरणाचा बराचसा भाग वाहून जाऊन खचलेला आहे. बाजूची खडीही वाहून गेली आहे. त्यामुळे नवीन केलेल्या नाल्यात खडी जाऊन नाले पूर्ण बुजलेले आहेत.
पावसामुळे वाहतूक कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. डांबरीकरण केलेल्या दुसऱ्या दिवशीच रस्ता वाहून खचून जत असेल, तर हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होते.
या संदर्भात सर्व कामाची माहिती घेऊन हे काम अंदाजपत्रक नुसार झाले आहे का नाही, याची चौकशी व्हावी. यासाठी पाठपुरावा करून संबंधित कंपनीवर कायदेशीर करवाई करण्यात यावी, यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा वायदंडे यांनी दिला आहे.