दुचाकींसाठी नवीन सिरीज १३ जुलैपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:06+5:302021-07-10T04:19:06+5:30
सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद होणाऱ्या नवीन दुचाकी वाहनांसाठी एमएच १० डीआर ही नवीन मालिका मंगळवारपासून (दि. ...
सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद होणाऱ्या नवीन दुचाकी वाहनांसाठी एमएच १० डीआर ही नवीन मालिका मंगळवारपासून (दि. १३) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
युवा कौशल्य दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन
सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. १५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या वेळेत ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकासचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
-----------
कृष्णाघाट पूल वाहतुकीसाठी बंद राहणार
सांगली : मिरज-अर्जुनवाड मार्गावर कृष्णा नदीवरील कृष्णाघाट मिरज येथील पूल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. आज शनिवारपासून २० जुलैपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. या मार्गावरील वाहतुकीचे प्रशासनाने नियोजन करावे व नागरिकांनीही याची माहिती देण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत.
-----