सांगलीत नवीन हळदीच्या सौद्यांना उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:03 PM2019-01-30T16:03:38+5:302019-01-30T16:04:31+5:30
यंदाच्या हंगामातील पहिल्या हळद सौद्यांना बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मार्केट यार्डात सकाळी ९.३५ च्या मुहूर्तावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. पहिल्याच सौद्याला २५ हजारावर पोत्यांची आवक झाली तर दरही समाधानकारक मिळताना सरासरी ११ हजार ९०० रूपयांपर्यंत दर मिळाला.
सांगली : यंदाच्या हंगामातील पहिल्या हळद सौद्यांना बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मार्केट यार्डात सकाळी ९.३५ च्या मुहूर्तावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. पहिल्याच सौद्याला २५ हजारावर पोत्यांची आवक झाली तर दरही समाधानकारक मिळताना सरासरी ११ हजार ९०० रूपयांपर्यंत दर मिळाला.
हंगामातील पहिल्याच सौद्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता संपूर्ण हंगामात चांगली आवक होणार असल्याची अपेक्षा व्यापाºयांनी व्यक्त केली. तर शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी आणण्याचे अवाहनही करण्यात आले.
मार्केट यार्डातील गणपती जिल्हा सोसायटीपासून सौद्यांना प्रारंभ झाला. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सौद्यांना सुरूवात झाली. यावेळी बाजार समितीचे सचिव एन. एम. हुल्याळकर, सतीश पटेल, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, माजी अध्यक्ष मनोहर सारडा, नलूभाई शहा, हार्दीक सारडा, दीपक चौगुले, शीतल पाटील यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.