पेठमध्ये नवविवाहितेने केला पतीवर विषप्रयोग, संशयित महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 01:48 PM2022-04-06T13:48:57+5:302022-04-06T13:50:06+5:30

पेठ (ता. वाळवा) येथे नवविवाहित पत्नीनेच पतीला अन्नातून विषप्रयोग करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली.

Newlyweds poison husband in Peth, suspect woman remanded in police custody for two days | पेठमध्ये नवविवाहितेने केला पतीवर विषप्रयोग, संशयित महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी

पेठमध्ये नवविवाहितेने केला पतीवर विषप्रयोग, संशयित महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथे नवविवाहित पत्नीनेच पतीला अन्नातून विषप्रयोग करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी महिलेस अटक केली आहे. येथील न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत प्रसन्न शिवप्रसाद खंकाळे (वय ३०, रा. पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरी प्रसन्न खंकाळे हिच्याविरुद्ध पतीच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रसन्न आणि गौरीचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले आहे. एक महिन्याच्या कालावधीत व्यवस्थित राहिल्यानंतर गौरीने प्रसन्नच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर तिला सर्वांनी नवीन लग्न असल्यामुळे समजावून घेतले. नातेवाइकांनी वाद-विवाद न करण्याबाबत सांगितले. फेब्रुवारी महिन्यात ती गर्भवती राहिली. त्यानंतर १७ मार्च आणि २१ मार्च रोजी गौरीने प्रसन्नच्या जेवणाचा डबा आणि चहामधून फिनेल घालून त्याच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ३० मार्च रोजी गौरीचा भाऊ शुभम तोडकर याचा मित्र अशू सुभाष कांबळे (रा. गिरगाव, जि. कोल्हापूर) गौरीकडे गुलाबजाम देऊन गेला होता. ४ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास गौरीने हे गुलाबजाम प्रसन्नला खायला दिले. त्यावेळी त्याने नकार दिला. गौरीने गुलाबजाम खाण्यासाठी जास्त आग्रह केल्याने त्याला संशय आला. त्याने गुलाबजाम चिरून पाहिले असता त्यामध्ये बुरशी आल्यासारखे आणि उंदिर मारण्याच्या औषधाचे तुकडे त्याला दिसले. त्यामुळे गौरी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय बळावल्याने प्रसन्नने तिच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Newlyweds poison husband in Peth, suspect woman remanded in police custody for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली