निकोप मानसिक आरोग्यासाठी विवेकी विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:25+5:302021-06-06T04:20:25+5:30

इस्लामपूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर प्रतिगामी परिणाम होतात. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे, असे ...

Nicope needs prudent thinking for mental health | निकोप मानसिक आरोग्यासाठी विवेकी विचारांची गरज

निकोप मानसिक आरोग्यासाठी विवेकी विचारांची गरज

Next

इस्लामपूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर प्रतिगामी परिणाम होतात. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील (लातूर) यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मानसिक आरोग्य व्यवस्थापन व विविध उपक्रम विभागाच्यावतीने ‘मन के साथ - मन की बात’ या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत त्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावर बोलत होत्या.

डॉ. पाटील म्हणाल्या की, मनोविकारांबद्दल समाजात अंधश्रध्दा आहेत. योग्य व वेळेत उपचार घेतल्यास तीव्र मनोविकार आटोक्यात आणणे शक्य होते. मानसिक आरोग्य बिघडल्यास शरिराला त्रास होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यास सामाजिक व जैविक कारणे आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्य जपले पाहिजे.

त्या म्हणाल्या, शरिराच्या स्वच्छतेबरोबरच मनाचीही स्वच्छता नियमित केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी केले पाहिजेत. योग्य समुपदेशन व उपचार केल्यास व्यसनाधिनता नाहीशी करता येऊ शकते.

अतुल सवाखंडे यांनी प्रास्ताविक केले तर नीलेश कुडाळकर यांनी परिचय करून दिला. धर्मराज चवरे यांनी सूत्रसंचालन केले. अजय भालकर यांनी आभार मानले. संजय बनसोडे, माधव बावगे, ठकसेन गोराने, विनायक सावळे, नितीन राऊत, अनिल करवीर, अवधूत कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: Nicope needs prudent thinking for mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.