उमदी दुहेरी खून प्रकरण: नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:19 PM2022-03-10T18:19:16+5:302022-03-10T18:47:09+5:30

या नऊ संशयित आरोपीना पंढरपूर येथे पकडले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीची चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

Nine accused in Umadi double murder sentenced to seven days in jail | उमदी दुहेरी खून प्रकरण: नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

उमदी दुहेरी खून प्रकरण: नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

Next

संख : जत तालुक्यातील उमदी येथे सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचा राग मनात धरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत गुंडू ऊर्फ मदगोंडा नागाप्पा बगली (वय २१), संतोष राजकुमार माळी (२१) या युवकांच्या दुहेरी खुनातील नऊ आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना विजापूर महामार्गावर पादगट्टी ठिकाणी घडली.

पूर्व भागातील उमदी मयत गुंडा ऊर्फ मदगोंडा बगली, संतोष राजकुमार माळी, प्रकाश महादेव परगोंड हे वर्गमित्र आहेत. गावात शिवजयंतीचा कार्यक्रमादिवशी स्टेजवर चढण्याच्या कारणावरून सोशल मीडियावर चॅटिंगवरून वाद झाला होता. मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान, दोन्ही गटांत सोशल मीडियाच्या चॅटिंगवरून वाद पुन्हा झाला. रात्री मयत त्याचे मित्र जेवायला गेले होते. शिवजयंतीचा राग मनात धरून संशयित दहा ते बारा जणांनी पाळत ठेवून रात्री ११.३० वाजता घरी येताना काठी, धारधार शस्त्र, दगडाने मारहाण केली.

मारहाणीत गुंडा ऊर्फ मदगोंड बगली, संतोष राजकुमार माळी यांच्या पोटावर, अंगावर धारदार शस्त्राचे वार झाले होते. प्रकाश परगोंड जखमी झाले. तिघांना नातेवाईकांनी सोलापूरला उपचारासाठी हलवले. दोघांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी परगोंडला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपासाची सूत्र उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्याकडे सोपविली.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले. पथकांनी हर्षवर्धन अनिल देशमुख, संदीप तुकाराम भोसले, अक्षय रामचंद्र भिसे, संजय उरफ मल्लिकार्जुन शामराव शिंदे, इंद्रजित यशवंत वाघ, विकास मनोहर भिसे, तेजस्व ऊर्फ यल्लाप्पा गंडाप्पा साळुंखे, मारुती सोमनिंग माळी ( रा. सर्व उमदी), विकास बिराप्पा गुळदगड (वय २४ कुलाळवाडी, ता. जत) या नऊ संशयित आरोपीना पंढरपूर येथे पकडले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीची चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

गुरुवारी जत येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर केली असता संशयित आरोपीना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, दुचाकी गाडी, अजून यात कोण सहभागी आहे, खुनाचे नेमके कारण काय, याचा तपास करायचा आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.

Web Title: Nine accused in Umadi double murder sentenced to seven days in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.