विमा भरपाईपासून नऊ तालुके वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:02 AM2017-09-09T00:02:36+5:302017-09-09T00:04:20+5:30

सांगली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१६ मधील विमा कंपनीकडून केवळ पलूस तालुक्यासाठी ७ लाख ५९ हजार रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे

 Nine Talukas deprived of insurance cover | विमा भरपाईपासून नऊ तालुके वंचित

विमा भरपाईपासून नऊ तालुके वंचित

Next
ठळक मुद्दे शेतकरी चिंतेत : पलूस तालुक्याला ७.५९ लाखसरकारचीही भूमिका तशीच असल्यामुळे वंचितएका तालुक्यास रक्कम मिळाल्यानंतर उशिराने का होईना, नुकसानभरपाई मिळेल,

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१६ मधील विमा कंपनीकडून केवळ पलूस तालुक्यासाठी ७ लाख ५९ हजार रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. मात्र जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज, वाळवा, शिराळा, कडेगाव या तालुक्यांतील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. विमा कंपनीच्या अजब कारभारामुळे हजारो शेतकºयांना भरपाई मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, विमा कंपन्यांना जगविण्याचे उद्योग शासनाने बंद करावेत, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.
प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गोंधळ असून यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यासाठी एकरकमी, एकाचवेळी येणारी भरपाई यावेळी हप्त्याने मिळणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकºयांनी विमा उतरविला होता. ७९ कोटी १७ लाख ९१ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता, त्यांची संरक्षित रक्कम २४८ कोटी २ लाख ८९ हजार रुपये होती. पलूस तालुक्यासाठी रक्कम प्राप्त झाली आहे. या तालुक्यातील तेराशे दोन शेतकºयांनी गतवर्षी खरीप पिकांचा विमा उतरवला.

यासाठी त्यांची विमा संरक्षित रक्कम २ कोटी २४ लाखांची होती, यासाठी त्यांनी शेतकºयांनी ७ लाख ५९ हजार, तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ३१ लाख ५१ हजार, असा एकूण ६७ लाख पन्नास हजार रूपयांचा विमा हप्ता भरला होता. मात्र या तालुक्यातील १२८० शेतकºयांना भरपाईचा लाभ मिळणार आहे. त्यांची विमा संरक्षित रक्कम ४ कोटी ४८ लाख रुपये आहे. मात्र शेतकºयांना प्रत्यक्षात ७ लाख ५९ हजार रूपये भरपाई मंजूर झाली आहे.

विमा कंपनीने ही रक्कम जिल्हा बॅँकेला दिली होती. ती बॅँकेने संबंधित शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली आहे. पलूससारख्या सधन तालुक्यातील शेतकºयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे, मात्र जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय खानापूर, तासगाव, कडेगाव, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यातील शेतकºयांना भरपाई मिळालेली नाही. मागील महिन्याभरापासून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. एका तालुक्यास रक्कम मिळाल्यानंतर उशिराने का होईना, नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी चिंंताग्रस्त आहेत.

विमा कंपन्यांना जगविणे बंद करावे : खराडे
नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष, डाळिंब बागांबरोबरच भाजीपाला पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. तसेच जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, शिराळा तालुक्यात शेतीचे नुकसान होऊनही भरपाईपासून शेतकºयांना पीक विमा कंपन्या वंचित ठेवत आहेत. याला सरकारचे पाठबळ असल्यामुळेच कंपन्यांचे फावले असून, यापुढे विमा कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा लढा उभारून शेतकºयांना न्याय मिळवून दिला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी दिला आहे.


विमा कंपन्यांचे धोरणच शेतकरीविरोधी : पाटील
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे शेतकºयांना भरपाई दिली जाते. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्या भरपाई देणार नसतील, तर त्या विम्याचा उपयोग काय?, असा प्रश्न शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे. शेतकºयांना भरपाईपासून वंचित ठेवल्याबद्दल कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून विमा कंपन्यांना भरपाई मिळवून देण्याऐवजी विमा कंपन्यांनाच पाठीशी घातले जात आहे. सरकारचीही भूमिका तशीच असल्यामुळे नऊ तालुके पीक विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Web Title:  Nine Talukas deprived of insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.