सांगलीतील नऊ वर्षीय प्रांजलने सर केला राज्यातील सर्वात अवघड किल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:05 PM2022-11-16T16:05:58+5:302022-11-16T16:06:26+5:30
सांगली : राज्यातील सर्वांत अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरव गड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला ...
सांगली : राज्यातील सर्वांत अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरवगड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला आहे. प्रांजल बावचकर असे तिचे नाव असून, सांगली गिर्यारोहकांच्या टीमसोबत तिने ही कामगिरी केली.
ठाणे जिल्ह्यात चढाईसाठी अतिशय बिकट आणि अवघड असा हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ४ हजार ९९७ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मोरोशीचा भैरवगड हा कायमच साहसी गिर्यारोहकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स ग्रुपने या ट्रेकचे नियोजन केले होते.
यात वीस सदस्यांसह प्रांजलही सहभागी झाली होती. यात तिने ही कामगिरी केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती गिर्यारोहण करते. आजपर्यंत तिने २५ हून अधिक गड-किल्ल्यांवर चढाई आणि जंगलभ्रमंती केली आहे. येथील डॉ. कल्याणी जगदाळे-बावचकर व सह्याद्री व्हेंचर्सचे संस्थापक सचिन बावचकर यांची ती कन्या आहे