तुरचीजवळ जबरी चोरीसह दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास नऊ वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

By शरद जाधव | Published: August 31, 2023 06:38 PM2023-08-31T18:38:55+5:302023-08-31T18:39:54+5:30

सांगली : तुरची फाटा (ता.तासगाव) येथे प्राणघातक हत्यारानिशी जबरी चोरी करणाऱ्या आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजूरीची ...

Nine years sentence for attempted robbery with forced theft near Turchi, Judgment of Sangli District Court | तुरचीजवळ जबरी चोरीसह दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास नऊ वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

तुरचीजवळ जबरी चोरीसह दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास नऊ वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

googlenewsNext

सांगली : तुरची फाटा (ता.तासगाव) येथे प्राणघातक हत्यारानिशी जबरी चोरी करणाऱ्या आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. राजा उर्फ राजू नागेश कोळी (वय २०, रा. काळीवाट, हरिपूर रोड,सांगली) असे आरोपीचे नाव आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.

खटल्याची अधिक माहिती अशी की, ७ सप्टेंबर २०२० रोजी तुरची फाटा येथे हा गुन्हा घडला होता. फिर्यादी हे पोकलॅण्ड मशिन घेऊन जात होते. यावेळी ट्रेलरच्या केबिनमध्ये ते बसले असता, आरोपी केबिनमध्ये शिरला. याबाबत कारण विचारले असता, त्याने मला गाडी शिकायची आहे असे म्हणाला. याचवेळी गाडीखाली असलेल्या दुसऱ्या आरोपीने कोयता काढून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी सकील वकील भोकरे यांनी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यावर जरब बसेल असे सांगितले. यानंतर न्यायालयाने कोळी यास नऊ वर्षाची शिक्षा सुनावली.

Web Title: Nine years sentence for attempted robbery with forced theft near Turchi, Judgment of Sangli District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.