‘माझी वसुंधरा’ अभियानात महापालिकेचा नववा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:32+5:302021-06-06T04:20:32+5:30

सांगली : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानात अमृत शहर गटात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने ...

Ninth number of Municipal Corporation in 'Majhi Vasundhara' campaign | ‘माझी वसुंधरा’ अभियानात महापालिकेचा नववा क्रमांक

‘माझी वसुंधरा’ अभियानात महापालिकेचा नववा क्रमांक

Next

सांगली : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानात अमृत शहर गटात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने नववा क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा १५०० गुणांची होती. पृथ्वी ६००, जल ४००, आकाश ३०० तर वायू आणि कागणी यांना प्रत्येकी १०० गुण होते. यामध्ये महापालिकेने ७७२ गुण मिळवले. ४३ शहरांतून नववा क्रमांक पटकावला. या गटात २६ महापालिकांचाही समावेश होता. स्पर्धेच्या २४ निकषांत रेन वॉटर हार्वेस्टिंग, रस्त्याकडेला वृक्षारोपण, नवीन हरित ठिकाणे, कचरा व प्लास्टिक व्यवस्थापन, तलावांचे सौंदर्यीकरण, हरित इमारती आदी प्रकारात महापालिकेच्या कामगिरीचे ऑनलाइन सादरीकरण शासनाला करण्यात आले. तलाव सौंदर्यीकरणात काळी खण व मिरजेतील गणेश तलाव, नवीन हरित ठिकाणांमध्ये न्यू प्राइडसमोरील आयुक्त बंगला तसेच समडोळी येथील कचरा डेपो यांचे सादरीकरण झाले. हरित इमारतींसाठी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या बंगल्याचे सादरीकरण झाले. उत्कृष्ट संवर्धन केलेले ठिकाण म्हणून जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातील विहिरीचे पुनरुज्जीवन सादर करण्यात आले. विहिरीच्या पाण्यावर वृक्षसंवर्धनाची दखल घेण्यात आली. अशी २४ ठिकाणे मायक्रोसॉफ्ट टीमने शासनाला सादर केली.

अभियानाचे कार्यक्रम प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, पंचमहाभुते तत्त्वांच्या आनुषंगाने अभियान आयोजित केले होते. महापालिकेने केलेल्या कामांची दखल घेत नवव्या क्रमांकासाठी निवड झाली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, पर्यावरण अभियंता ऋषीकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार, शहर समन्वयक वर्षाराणी जाधव यांच्यासह विभाग प्रमुखांनी अभियानात सहभाग घेतला.

चौकट

पंचतारांकित घर संकल्पनेचे कौतुक

आयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेतील पंचतारांकित घर संकल्पनेचेही सादरीकरण अभियानात झाले. राज्यात अशी संकल्पना प्रथमच सादर झाली होती. शासनाने त्याचे विशेष कौतुक केले.

Web Title: Ninth number of Municipal Corporation in 'Majhi Vasundhara' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.