पोलिसांच्या समर्थनार्थ निफाडला स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: September 22, 2016 10:54 PM2016-09-22T22:54:45+5:302016-09-22T22:56:45+5:30
पोलिसांच्या समर्थनार्थ निफाडला स्वाक्षरी मोहीम
सांगली : मराठा समाजाने आरक्षणासह अन्य प्रश्नांवर दि. २७ सप्टेंबर रोजी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चास दलित महासंघाचा पाठिंबा आहे, अशी माहिती दलित महासंघाचे नेते प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाच्या अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाली. या बैठकीस महासंघाचे कार्याध्यक्ष उत्तम चांदणे, सरचिटणीस शेखर महापुरे, जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, शहाजी मोरे, सुनील वारे उपस्थित होते. बैठकीत मराठा समाजाच्या क्रांती मोर्चास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यास आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रश्नावर लोकशाही मार्गाने ते मोर्चा काढत आहेत. यास विरोध करण्याचा प्रश्नच नाही. कोपर्डी येथील घटना घडल्यानंतर प्रथम निषेध आम्हीच केला होता. यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. (वार्ताहर)
मिरज : मागासवर्गीय सेलतर्फे प्रदेश उपाध्यक्ष व मिरजेचे काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. मराठा व दलित समाजात फूट पाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मागासवर्गीय समाज मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी सांगितले. मराठा मोर्चाचे श्रीरंग पाटील यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद दाभाडे, सुहास सावर्डेकर, मधुकर बामणीकर, अशोक रजपूत, सुधीर कांबळे, विकास वाघमारे, हैदर शेख, मनोज मोहिते, श्रीधर शिंगे यावेळी उपस्थित होते.
सुभाषनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. पी. कोकाटे, उपाध्यक्ष एस. पी. महाजन यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. जिल्हा प्रवासी वाहतूक अॅपे रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, जय भारत आॅटोरिक्षा संघटना व मिरज रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे सचिन चौगुले, अजमुद्दीन खतीब, रफिक शेख यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. मराठा सेवा संघाचे रमेश पवार, विलास देसाई यांना रिक्षाचालकांनी पाठिंब्याचे निवेदन दिले. याव्ेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
तीन हजार युवक मांजर्डेतून जाणार
मांजर्डे : मराठा मोर्चासाठी मांजर्डे (ता. तासगाव) येथून तीन हजाराहून अधिक नागरिक सहभागी होण्याचा निर्धार बैठकीमध्ये करण्यात आला.
अॅड. कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत येथे हनुमान मंदिरासमोर नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी, मराठा समाजाची सर्व क्षेत्रामध्ये गळचेपी चालली असल्याचे सांगून, कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी, तसेच अॅट्रॉसिटीबाबत बदल, मराठा समाजाला आरक्षण, शिवाजी महाराजांचे स्मारक, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील यांच्या नावे महामंडळाची स्थापना आदी मागण्या केल्या. यावेळी कोळी, मुस्लिम, माळी, रामोशी समाजाने मोर्चाला पाठिंबा दर्शविला.
मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. गावातील सर्व वाहनधारकांनी २७ रोजीच्या मोर्चासाठी मोफत वाहने देण्याचे जाहीर केले. (वार्ताहर)