नितीन जाधव यांच्याकडून आरळा परिसरात १३० झाडांचे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:49+5:302021-08-20T04:30:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : आरळा बेरडेवाडी (ता. शिराळा) येथे डॉ. नितीन जाधव यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त १३० वेगवेगळ्या प्रकारच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : आरळा बेरडेवाडी (ता. शिराळा) येथे डॉ. नितीन जाधव यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त १३० वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले. त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, फणस, करंज, जांभळ, कोकम, सीता, अशोक, सीताफळ,काजू, चिंच, शेंदूर, अडूळसा आदी वेगवेगळ्या प्रकारची जंगली, औषधी, तसेच फळझाडे लावण्यात आली.
या उपक्रमासाठी त्यांना प्लॅनेट अर्थी फाऊंडेशनचे आकाश पाटील, प्रणव महाजन, प्रथमेश महाजन यांचे सहकार्य लाभले. यावेळी आरळा गावचे सरपंच आनंदराव कांबळे, डॉ. कृष्णा जाधव उपस्थित होते. शिराळा येथे डॉ. जाधव यांनी मियावाकी प्रकल्प केला असून यामध्ये ६९ प्रजातींची ६०० झाडे लावण्यात आली आहेत. ती झाडे २२ ते २५ फूट वाढली आहेत. पर्यावरण संवर्धन जैवविविधता जोपासण्यास या प्रकल्पामुळे मदत झाली आहे.