महापालिकेने १५ लाख लसी खरेदी कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:30+5:302021-05-29T04:21:30+5:30

ओळी :- महापालिका क्षेत्रातील लसीकरणासह विविध मागण्यांबाबत शिवसेनेच्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

NMC should procure 15 lakh vaccines | महापालिकेने १५ लाख लसी खरेदी कराव्यात

महापालिकेने १५ लाख लसी खरेदी कराव्यात

Next

ओळी :-

महापालिका क्षेत्रातील लसीकरणासह विविध मागण्यांबाबत शिवसेनेच्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेने १५ लाख कोरोना लस खरेदी कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जितेंद्र शहा, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, लक्ष्मण वडर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेने १५ लाख कोरोना लसींचे डोस खरेदीसाठी निविदा काढावी, केंद्र सरकारने आडमुठे धोरण बदलून विविध देशांच्या लस खरेदी करण्यास सर्व राज्यांना परवानगी द्यावी, राज्य सरकारने ग्लोबल टेंडरमधील लस खरेदी तात्काळ आठ दिवसांत पूर्ण करावी, उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मागेल त्या कंपनीला, मागेल त्या ठिकाणी कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: NMC should procure 15 lakh vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.