ना काॅल, ना ओटीपी, तरीही बँकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला परमिशन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:24+5:302021-06-19T04:18:24+5:30

सांगली : सध्या मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून गैरप्रकारही वाढत चालले आहेत. सोशल मीडिया, फ्री गेम, अनोळखी ॲपच्या माध्यमातून ...

No call, no OTP, yet money disappears from the bank; Free game, avoid unfamiliar app permissions | ना काॅल, ना ओटीपी, तरीही बँकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला परमिशन टाळा

ना काॅल, ना ओटीपी, तरीही बँकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला परमिशन टाळा

googlenewsNext

सांगली : सध्या मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून गैरप्रकारही वाढत चालले आहेत. सोशल मीडिया, फ्री गेम, अनोळखी ॲपच्या माध्यमातून नागरिकांचे खिसे रिकामे होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यंदा मेअखेरपर्यंत फसवणुकीच्या २३ तक्रारी सायबर सेलकडे दाखल आहेत. त्यामुळे अनोळखी ॲप, गेमला परमिशन देणे टाळले पाहिजे. अन्यथा बँकेच्या खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर पश्चाताप करण्यापलीकडे काहीच हाती राहत नाही.

मोबाईलवर अनेक फसव्या कंपन्यांच्या जाहिराती येत असतात. या कंपन्यांचे ॲप डाऊनलोड केल्यास पैशाचे आमिषही दाखविले जाते. तोच प्रकार फ्री गेमबाबतही आहे. ॲप, गेम डाऊनलोड केल्यानंतर कंपन्यांकडून मोबाईलधारकांचे बँक डिटेल्स घेतले जातात. वास्तविक बँकेकडूनही वारंवार अशी माहिती कुणालाही देऊ नका, असे सांगितले जात असतानाही बँक खात्याची माहिती शेअर केली जाते. एकदा का माहिती ठकसेनाच्या हातात आली की बँकेच्या खात्यातून पैसे गायब केले जातात. मग पोलिसांत तक्रार करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही.

चौकट

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

१. बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंड आदी ठिकाणाहून कंपनीच्या नावे काॅल केले जातात. पण त्याचा पोलिसांना पत्ता लागत नाही.

२. या ठकसेनाच्या हाती बँक खात्याची माहिती हाती पडताच अवघ्या काही मिनिटांत खात्यावरील पैसे गायब केले जातात.

३. परप्रांतीय ठकसेनाचा शोध घेणे अनेकदा पोलिसांच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे अशा प्रकरणात पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच आहे.

४. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाच देऊ नये. तर असे प्रकार टाळता येतील.

चौकट

अनोळखी ॲप नकोच

१. सोशल मीडियासह विविध प्लॅटफार्मवर अनोळखी ॲपचा सातत्याने मारा सुरू असतो. या ॲप कंपन्यांकडून पैशाचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे तरुण मुले, आपणही त्याकडे आकर्षित होतो.

२. या ॲप, गेमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक पद्धतीवर केला जातो. हा तपास अत्यंत किचकट व गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे संशयितापर्यंत पोहोचणे व त्याला अटक करणे तितके सोपे नसते.

३. मोबाईल, सोशल मीडियाचा वापर करतानाच प्रत्येकाने सावधानता बाळगली पाहिजे. फसगत झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे.

चौकट

कोट

सा‌वधानता, वेळीच काळजी घेणे हाच उपाय

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच सावधानता बाळगली पाहिजे. वेळीच काळजी घेणे, अनोळखी व्यक्तीला माहिती न देणे, हाच त्यावर उपाय आहे. - संजय क्षीरसागर, निरीक्षक सायबर सेल विभाग

चौकट

दरवर्षी जिल्ह्यात घडतात फसवणुकीचे प्रकार

१. सायबर सेल, बँकेकडूनही वारंवार नागरिकांना फसवणूक टाळण्याचे आवाहन केले जाते.

२. तरीही नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे फसवणुकीचे प्रकार सर्रास सुरू आहेत.

३. सायबर सेलकडून नागरिकांना नेहमीच मदतीचा हात दिला जात आहे.

चौकट

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे

२०१९ : --

२०२० :--

मे २०२१ : २३

Web Title: No call, no OTP, yet money disappears from the bank; Free game, avoid unfamiliar app permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.