कोविड लसीबाबत शंका नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:13+5:302021-01-23T04:27:13+5:30
जत : पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका ...
जत : पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता ही लस सर्वांनी घ्यावी, याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले.
जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड- १९ लसीकरण मोहिमेस आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते. जत ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर व शालेय आरोग्य तपासणी विभागाचे डॉ. शिवाजी खिलारे यांना प्रथम लस देऊन कोविशिल्ड - १९ लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
जत तालुक्यातील वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील १६९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविशिल्ड - १९ लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली होती. सध्या १०० डोस मिळाले आहेत. आणखी डोस मिळणार आहेत. सुरुवातीला जत ग्रामीण रुग्णालयात आठ दिवस लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी यावेळी दिली.
जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत पं. स. सदस्य रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मोहिते, सांगली सिव्हिलचे डॉ. परवेज नाईकवाडी, डॉ. विशाल खोत, डॉ. अभिजित पवार, डॉ. रवी जिवनावर, डॉ. शिवाजी खिलारे, भीमराव सानप, महेंद्र राऊत , दिलीप शिंदे, गौस खतीब व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
फोटो-२२जत१ व २