झेडपीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदावर अतिक्रमण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:32+5:302021-01-10T04:19:32+5:30
ते पुढे म्हणाले, आरोग्य सहसंचालकांनी ६ जानेवारी रोजी एक आदेश काढून पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक ...
ते पुढे म्हणाले, आरोग्य सहसंचालकांनी ६ जानेवारी रोजी एक आदेश काढून पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक व आरोग्यसेवक ही पदे हिवताप विभागाचे आहेत, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद आस्थापनेवरील आरोग्य कर्मचाऱ्यांची हजारो पदे कायमचे बंद होणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकरी आणि पगाराचाही प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे आरोग्य सहसंचालकांनी असा आदेश काढण्यापूर्वी आरोग्य कर्मचारी संघटनेशी चर्चा करणे अपेक्षित होते. याबद्दल कोणतीही चर्चा न करता आदेश काढल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पदावर अतिक्रमण करू नये, असा इशाराही खरमाटे आणि जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दिला आहे.