सांगलीत अंत्यविधीसाठी नागरिकांची गैरसोय नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:31+5:302021-05-26T04:27:31+5:30
यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सहायक आयुक्त अशोक कुंभार, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, ...
यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सहायक आयुक्त अशोक कुंभार, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, मुकादम सचिन मद्रासी, अंत्यविधी साहित्य ठेकेदार सचिन कदम उपस्थित होते. येथील अमरधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी साहित्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी महापौर सूर्यवंशी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने महापौरांनी आरोग्य विभाग व ठेकेदारासोबत बैठक घेतली. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, अशा स्पष्ट शब्दात सूचना केल्या.
ठेकेदाराने दहन कट्ट्यापर्यंत लाकूड पोहोच करावे, किमान पाच ते सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतील, इतके साहित्य स्मशानभूमीच्या शेडमध्ये कायम ठेवावे, साहित्य पुरवठ्यासाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, गॅस दाहिनीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. यासाठी महावितरणकडून स्वतंत्र वीज जोडणी घ्यावी, अन्यथा जनरेटरची सोय करावी, अशा सूचनाही महापौरांनी केल्या.