दीड लाख नव्हे, संपूर्ण कर्जमाफी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:42 PM2017-07-28T23:42:02+5:302017-07-28T23:42:57+5:30

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकवेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतकºयांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता?,

No one hundred and fifty lakh, full debt relief | दीड लाख नव्हे, संपूर्ण कर्जमाफी हवी

दीड लाख नव्हे, संपूर्ण कर्जमाफी हवी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाहीगोवंश हत्येवरील बंदीही केंद्र व राज्य सरकारने उठवावी, शेतकरी आणि त्यांची पोरच मंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखतील.

रघुनाथदादा पाटील : शेतकºयांनी अर्ज भरू नयेत; फडणवीस सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकवेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतकºयांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता?, असा सवाल शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच दीड लाख नव्हे, संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आर या पारची लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेतकºयांना कर्जातून मुक्त करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. कर्जमाफी करून शेतकºयांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही. कर्जमाफीचा एकदा निर्णय घेतल्यानंतर, दहावेळा शासनाने आदेश बदलण्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली जाते. पण, त्यांच्यासारखे तात्त्विक धोरण राबविण्यात मुख्यमंत्री फडणवीस पूर्णत: अपयशी ठरले आहेत. कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असताना शेतकºयांकडून अर्ज भरून पुन्हा काय साध्य करणार आहेत? शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे एकमेव धोरण फडणवीस सरकारचे आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनाकडून जाहीर केलेले कोणतेही अर्ज भरून देऊ नयेत, ते पूर्णत: बोगस आहेत. फडणवीस यांनी याच अधिवेशनात शंभर टक्के कर्जमुक्ती शेतकºयांना दिली पाहिजे. ज्या शेतकºयांनी कर्ज भरले असेल, त्यांनाही पैसे परत दिले पाहिजेत. याबद्दल ठोस निर्णय न झाल्यास दि. १५ आॅगस्ट रोजी एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. शेतकरी आणि त्यांची पोरच मंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखतील.

मुख्यमंत्र्यांचा सज्जनपणाचा आवच
मुख्यमंत्री फडणवीस सज्जन असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात भ्रष्टाचारी आमदार, मंत्र्यांवर ते काहीच कारवाई करीत नाहीत. महाराष्ट्रात एकटे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच भ्रष्टाचारी आहेत, उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री ाज्ज्सन आहेत का? त्यांच्यावर कारवाईचा एकही शब्द फडणवीस बोलत नाहीत. म्हणजेच मुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली.

बैलगाडी शर्यतीवरील जाचक अटी थांबवा
शेतकºयांच्या दबावामुळे अखेर केंद्र आणि राज्य सरकारला झुकावे लागले. म्हणूनच बैलगाडी शर्यतीवरील बंदी शासनाने उठविली आहे. याचप्रमाणे बैलगाडी शर्यती घेण्यासाठी लादलेल्या जाचक अटींतूनही शेतकºयांची सुटका करा. अन्यथा त्यासाठी पुन्हा आम्हाला लढा उभारावा लागेल, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. तसेच गोवंश हत्येवरील बंदीही केंद्र व राज्य सरकारने उठवावी, अशीही त्यांनी मागणी केली.

Web Title: No one hundred and fifty lakh, full debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.