..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:17 PM2024-09-28T17:17:38+5:302024-09-28T17:18:37+5:30

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. ...

No one will get a majority in the Legislative Assembly says Prakash Ambedkar | ..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर 

..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर 

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. पण रत्नागिरीतील सभेत त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे ते पहिले बळी ठरले आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. सोमनाथ साळुंखे, इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, नितीन सोनवणे, विज्ञान माने आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पवार यांनी जरांगे यांच्या मागणीला आतापर्यंत अत्यंत शिताफीने टाळले होते. पण रत्नागिरीतील सभेत त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे ते सध्या फक्त मराठा नेते राहिले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून फेब्रुवारीत निवडणुकांचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न होते, पण आम्ही त्यातील संविधानिक पेच सांगितला. त्यानुसार १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.

..त्यामुळे विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही

आंबेडकर म्हणाले, एससी, एसटी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील, असे वाटत नाही. मुस्लिम घटकही टक्केवारीच्या आधारे महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत आहे. त्याची पूर्तता झाली, तरच ते आघाडीच्या पाठीशी राहतील. लोकसभेत आमचा वापर झाल्याने विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

तर पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे यांचे आंदोलन

मनोज जरांगेंमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यांची लवचिक भूमिका आता संपली आहे. सामान्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा फायदा होणार नाही. जरांगे यांची मागणी संविधानिक नाही. ५५ लाख कुणबी प्रमाणपत्रे बेकायदा आहेत, ती रद्द करावीत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही, तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर ते आंदोलन करीत होते, हे स्पष्ट होईल.

आंबेडकर म्हणाले..

- सांगली, मिरजेच्या उमेदवारांची यादी तयार
- मराठवाड्यात मराठा व ओबीसी लढत
- विधानसभेला लोकसभेसारखे निकाल नसतील
- अडीच महिन्यांत २२ ठिकाणी दंगलीची परिस्थिती

Web Title: No one will get a majority in the Legislative Assembly says Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.