नको बिबट्याची अफवा; हवी फक्त सतर्कता!

By admin | Published: July 22, 2016 11:25 PM2016-07-22T23:25:02+5:302016-07-23T00:11:49+5:30

खंडाळा तालुक्यात वन्यप्राणी : ‘लोकमत’ कार्यालयात प्राणीमित्रांनी व्यक्त केली मते --लोकमत परिचर्चा

No scary rumors; Only alertness! | नको बिबट्याची अफवा; हवी फक्त सतर्कता!

नको बिबट्याची अफवा; हवी फक्त सतर्कता!

Next

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या पाटण तालुक्यातील धानकल येथे दहा फुटी अजगर सापडले तर कण्हेर धरणाजवळ सापडलेल्या सात फुटी मगरीवर बसून फोटोसेशन केले गेले. तर नुकतेच खंडाळा येथील अंदोरी येथे दोन बिबट्यांचे नागरिकांना दर्शनही झाले. वन्यप्राणी लोकवस्तीत येत असल्याच्या एका पाठोपाठ तीन घटना घडल्याने काही ठिकाणी नागरिकांचा उत्साह तर काही ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अशा प्रकारचे प्राणी दिसल्यानंतर नागरिकांनी काय भूमिका घेतली पाहिजे, हे नागरिकांना माहिती व्हावे, यासाठी ‘लोकमत’ कार्यालयामध्ये वनविभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील वन्यप्रेमींचा परिचर्चा आयोजित करण्यात आला.
बिबट्या विनाकरण कोणावर हल्ला करत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या एका ठिकाणी राहत नाही तो सतत जागा बदलत असतो. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन करून वनखात्याने पुढाकार घेऊन जनजागृजी करावी, असे मतही या चर्चामध्ये वन्यप्रेमींनी मांडले.
खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर अनेक मत-मतांतरे समोर आली. हा बिबट्या अंदोरी येथे कसा आला असेल? यावर खंडाळ्याचे वन्यप्रेमी रवींद्र पवार म्हणाले, ‘अंदोरी हे गाव पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. शेजारीच नदी आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात बिबट्या या ठिकाणी आला असावा. आजपर्यंत या भागात कोणालाही हिंस्त्रप्राणी दिसले नव्हते. त्यामुळे या भागातील लोक आणखीनच घाबरत आहेत.’
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीचे अध्यक्ष अमित सय्यद म्हणाले, ‘जंगलात बिबट्यांचे खाद्य कमी झाले आहे. अन्नाच्या शोधात बिबट्या नागरीवस्तीत आला असावा. आपण लोक त्यांच्या जंगलात चाललो आहोत, हे थांबले पाहिजे.
अनेकदा लोक अफवा पसरवतात. त्यामुळे विनाकारण वनविभागालाही वेठीस धरले जाते. अंदोरीजवळ दिसलेला बिबट्या मादी असावी, दोन वर्षांच्या बछड्याला मादी सोडून देते. ही मादी आपल्या बछड्याला सोडायला आली असावी,’ अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
वन्यजीव प्राणी सगळीकडेच दिसतात. त्यामुळे नागरिकांनी असे प्राणी दिसल्यास फार गाजावाजा करू नये, त्यांच्यापासून काही अंतरावर थांबल्यास हे प्राणी कोणालाही इजा न करता निघून जातात, असेही मत वन्यप्रेमींनी व्यक्त केले. (लोकमत चमू)


अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत
कोणताही प्राणी मनुष्यवस्तीत येत नाही. खायला, प्यायला अन् लपायला हा बिबट्या आला असेल. नैसर्गिकरीत्या जेथून बिबट्या आला असेल, तेथे परत जाईल.
- तानाजी गायकवाड (सहायक वनसंरक्षक)

बिबट्या हल्ला
कधी करतो...
बिबट्याला असुरक्षित वाटल्यास
तो हल्ला करतो.
४गुपचूपपणे त्याच्याजवळून चालत गेल्यास.
४बिबट्यासमोर खाली बसल्यास तो हल्ला करतो.
४बिबट्याच्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीवर तो हल्ला करत नाही.

बिबट्या हल्ला
कधी करतो...
बिबट्याला असुरक्षित वाटल्यास
तो हल्ला करतो.
४गुपचूपपणे त्याच्याजवळून चालत गेल्यास.
४बिबट्यासमोर खाली बसल्यास तो हल्ला करतो.
४बिबट्याच्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीवर तो हल्ला करत नाही.

Web Title: No scary rumors; Only alertness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.