महापालिका कार्यालयात विनामास्क प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:11+5:302021-03-05T04:26:11+5:30
ओळी : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेत मास्कची सक्ती करण्यात आली असून, थर्मल गनद्वारे तपासणी करूनच प्रवेश दिला ...
ओळी : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेत मास्कची सक्ती करण्यात आली असून, थर्मल गनद्वारे तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. विनामास्क कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारे तपासणी करूनच गुरुवारी प्रवेश दिला जात होता.
महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यानुसार महापालिकेच्या इमारतीमध्ये येणाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मास्क नसेल तर प्रवेश न देण्याबाबत तसेच सॅनिटायझरचा वापर करून इमारतीमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त राहुल रोकडे यांनी कडक अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासकीय कार्यालयाला आदेश दिले असून, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.