कोणीही गेले तरी बहुमत आमचेच
By admin | Published: February 10, 2017 12:06 AM2017-02-10T00:06:44+5:302017-02-10T00:06:44+5:30
जयंत पाटील : काळमवाडी येथे राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारास प्रारंभ
नेर्ले : कोणी कितीही सोडून गेले, तरी बहुमतापर्यंत पोहोचण्यास फारशी अडचण नाही. ही निवडणूक महत्त्वाची आहे़ आपापसातील गट-तट, मतभेद बाजूला ठेवून प्रचाराला लागा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. याचवेळी त्यांनी भिन्न विचार, आचार, कर्तृत्वाचे लोक एकमेकाला कडकडून मिठ्या का मारीत आहेत? हे न कळण्याइतपत वाळवा तालुक्यातील जनता खुळी नाही, या शब्दात विकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले.
काळमवाडी (ता. वाळवा) येथे आमदार पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, जिल्हा मध्य़ बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जनार्दनकाका पाटील, पी़ आऱ पाटील, बी़ के. पाटील, विष्णुपंत शिंदे, सभापती रवींद्र बर्डे, डॉ़ प्रताप पाटील, प्रा़ सुकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ़ पाटील म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन, बऱ्याच चर्चा करून उमेदवारी निश्चित केली आहे़ तरीही सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही़ पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी करताना काहीजणांना थांबावे लागेल़ समजून घ्या़. जिल्हा परिषदेत आपली सत्ता असल्याने आपण वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक विकासकामे करू शकलो आहे़ देवराज पाटील, रणजित पाटील, लिंबाजी पाटील या तरुण सहकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे़ मला जिल्ह्यात प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने महत्त्वाच्या सभांना बोलवा़ यावेळी त्यांनी भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत सरकारच्या धोरणावर हल्ला चढविला़
सत्यजित देशमुख म्हणाले, आम्ही चारही जागा जिंकून विजयाची नांदी करू़ या मंडळींच्या भूलथापांना बळी पडू नका़ दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, जनार्दनकाका पाटील, पी़ आऱ पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सौ़ सुस्मिता जाधव, उद्योगपती दिनकर पाटील, वैभव शिंदे, सौ़ सुनीता देशमाने यांनीही मनोगत व्यक्त केले.
तालुकाध्यक्ष बी़ के़ पाटील यांनी स्वागत केले़ याप्रसंगी प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, झुंझारराव शिंदे, सौ़ भाग्यश्री शिंदे, नेताजीराव पाटील, प्रताप पाटील, जगन्नाथ पाटील, ग़ चि़ ठोंबरे, संजय कोरे, रघुनाथ पाटील, सोमराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. लक्ष्मण सावंत यांनी आभार मानले़ अजित बारवडे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)