इंधन दरवाढीतून ‘अच्छे नव्हे, बुरे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:16+5:302021-01-08T05:31:16+5:30
वेटम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ आले असून, घरगुती प्रति गॅस सिलिंडर ७०० रुपयांवर, तर ...
वेटम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ आले असून, घरगुती प्रति गॅस सिलिंडर ७०० रुपयांवर, तर पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. यातून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. साधे पेट्रोल प्रति लिटर ९१ रुपये, तर डिझेल ८० रुपयांवर गेले आहे. एक्स्ट्रा प्रिमियम पेट्रोल प्रति लिटर ९४ रुपये इतके झाले आहे. लवकरच पेट्रोलचे दर ‘अबकी बार सौ पार’ होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे सामान्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, आर्थिक शोषण झाले. यातच या इंधन दरवाढीचा परिणाम ऊर्जाक्षेत्रावरही होणार आहे. परिणामी विद्युत बिलसुद्धा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही या दरवाढीचा जाहीर निषेध व्यक्त करतो.
भारतीय जनतेचे मोदी सरकारतर्फे केलेले हे मोठे शोषण आहे. पेट्रोलची एक्स-रिफायनरी ३० रुपये प्रति लिटर आहे. उर्वरित डीलर चार्ज, एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट असे सर्व प्रकारचे कर आणि पेट्रोल पंप कमिशन यातून ६० रुपयांची भर घालतात.
मोदी सरकारचे हेच ‘अच्छे दिन’ असून, नागरिकांनी या दरवाढीप्रश्नी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन वेटम यांनी केले.