पलूसमध्ये दिसलेला बिबट्या नसून तरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:00+5:302021-03-26T04:27:00+5:30
पलूस : येथील परिसरात मंगळवारी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ते ठसे हे बिबट्याचे ...
पलूस : येथील परिसरात मंगळवारी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ते ठसे हे बिबट्याचे नसून, तरस या वन्यप्राण्याचे असल्याचे म्हटले आहे. पलूस-आमणापूर रस्त्यावरील परिसरात मंगळवारी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. नागरिकांनी याबाबत वनखात्याला कळवले. मात्र, वनखात्याने निरीक्षण केल्यानंतर मिळालेले ठसे हे बिबट्याचे नसून, तरस या वन्यप्राण्याचे असल्याची माहिती पुढे आले आहे.
पलूस शहरापासून एक किलोमीटरवर असलेल्या पुदाले वस्तीवर विनय करमरकर यांना वन्यप्राणी दिसला. त्यांना तो बिबट्या वाटला. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनअधिकारी ढेरे व त्यांचे सर्व सहकारी, कर्मचारी यांनी गुरुवारी सकाळी या परिसरास भेट दिली. त्यांनी या ठशांची पाहणी करून तो बिबट्या नसून, ते तरस असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच, रात्री निर्जन भागात एकटे फिरू नये, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.