महापौरपदासाठी 'व्हिप' नव्हे; पॅकेज येणार कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:49 AM2021-02-21T04:49:57+5:302021-02-21T04:49:57+5:30

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी भाजपकडून पुढे करण्यात आलेले ‘व्हिप’ अस्त्र तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर निष्प्रभ करण्याची तयारी विरोधकांनी ...

Not a ‘whip’ for the mayoralty; The package will work | महापौरपदासाठी 'व्हिप' नव्हे; पॅकेज येणार कामी

महापौरपदासाठी 'व्हिप' नव्हे; पॅकेज येणार कामी

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी भाजपकडून पुढे करण्यात आलेले ‘व्हिप’ अस्त्र तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर निष्प्रभ करण्याची तयारी विरोधकांनी केली असून, व्हिपऐवजी नगरसेवकांना दिले जाणारे ‘पॅकेज’ निर्णायक ठरणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पॅकेजची तयारी सुरू आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सध्या ४३ संख्याबळासह भाजप सत्तास्थानी भक्कमस्थानी आहे. त्यांचे हे स्थान कमकुवत करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसने नाराज गटाला पॅकेजच्या आधारावर खेचण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, भाजपने व्हिपसाठी जोरदार तयारी केली असली तरी ऑनलाईन सभेतील तांत्रिक अडचणींचा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. अशा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर हा व्हिप कुचकामी ठरविण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली. भाजपच्या नाराज गटाला त्याबाबतचा कानमंत्रही दिला आहे. सत्ता एकाची आणि पद दुसऱ्याच्या वाट्याला येण्याच्या घटना महापालिकेत यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे यंदाही त्यासाठीच विरोधकांनी त्यांची ताकद पणाला लावली आहे. भाजपकडे सध्या व्हिपचे एकच अस्त्र असल्याने त्यांनी त्याविषयी पूर्ण तयारी केली आहे. या आधारे भाजपला नाराजी रोखण्यात कितपत यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट

तक्रारी होण्याची शक्यता

मतदान प्रक्रिया ऑनलाईन सभेद्वारे होणार आहे. यामध्ये सदस्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींअभावी तक्रारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा सर्वच पक्षांना प्रथमच ऑनलाईन मतदान प्रक्रियेद्वारे निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे.

चौकट

पॅकेज प्रभावी

नाराज नगरसेवकांसह कोणत्याही वेळी मत बदलणाऱ्या सदस्यांसाठी पॅकेज देण्याची तयारी पक्ष व उमेदवारांनी केल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून अनेक बाबतींत वंचित असलेल्या व भविष्यातील निवडणुकीची तजवीज करू पाहणाऱ्या सदस्यांना हे पॅकेज खेचण्यासाठी पुरेसे आहे, असे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Not a ‘whip’ for the mayoralty; The package will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.