आटपाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:35+5:302021-07-10T04:19:35+5:30
याबाबत सरपंच वृषाली पाटील यांनी कायदेशीररीत्या नोटीस कर्मचाऱ्यांना पाठवली असून कामावर उपस्थित राहिला नाही, तर ठोस निर्णय घेतला जाईल, ...
याबाबत सरपंच वृषाली पाटील यांनी कायदेशीररीत्या नोटीस कर्मचाऱ्यांना पाठवली असून कामावर उपस्थित राहिला नाही, तर ठोस निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतीकडे सहा कर्मचारी मंजूर आहेत. परंतु, सध्या ४५ कर्मचारी आहेत. त्यांना नोकरीच्या भरती प्रक्रियेच्यावेळी कोणत्याही शासकीय नियम व अटींचे पालन न करता बेकायदेशीरपणे नेमणूक करून घेतली आहे. अर्धवेळ कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमणुकीचा आदेश दिला नाही.
कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नियम ग्रामपंचायत कर्मचारी यांना बंधनकारक असतानादेखील कर्मचारी कामबंद आंदोलन करून गावास वेठीस धरले आहे. नोटीस मिळाल्यापासून आठ तासांच्या आत कामावर हजर राहावे, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा नोटीसव्दारे इशारा देण्यात आला आहे.