विधानपरिषदेची अधिसूचना जारी
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM2016-10-26T23:08:37+5:302016-10-26T23:08:37+5:30
निवडणूक प्रक्रिया सुरू : मोहनराव कदम आज अर्ज भरणार
सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी, पहिल्यादिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. गुरुवारी, २७ आॅक्टोबर रोजी कॉँग्रेसतर्फे मोहनराव कदम यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. सांगली - सातारा विधानपरिषदेसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २२ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. निवडणुकीची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानपरिषदेत समाविष्ट असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आघाडीत बिघाडी झाल्याने यंदा दोन्ही कॉँग्रेस आमने-सामने दिसणार आहेत. गेला महिनाभर या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुंबईत बुधवारी दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यामुळे या बैठकांकडे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांचेही दिवसभर लक्ष लागले होते. कॉँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव कॉँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे दाखल केला आहे. (प्रतिनिधी) सांगली-सातारा जिल्ह्यातील असे आहेत मतदार... स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य वाई नगरपरिषद २० महाबळेश्वर नगरपरिषद ११ पाचगणी नगरपंचायत१७ लोणंद नगरपंचायत १८ फलटण नगरपरिषद२८ म्हसवड नगरपरिषद १९ जिल्हा परिषद, सातारा७० सातारा नगरपरिषद ४३ रहिमतपूर नगरपरिषद१९ कऱ्हाड नगरपरिषद३२ मलकापूर नगरपंचायत१९ तासगाव नगरपरिषद२१ विटा नगरपरिषद २५ इस्लामपूर नगरपरिषद२८ आष्टा नगरपरिषद २१ जिल्हा परिषद सांगली७० महापालिका ८१ जत नगरपरिषद २० एकूण ५७० आठ अर्जांची विक्री पहिल्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, नगरसेवक शेखर माने यांनी आठ अर्ज घेतले. दिवसभरात एकही अर्ज दाखल झालेला नाही.