सांगलीत गस्तीसाठी आता अत्याधुनिक ‘आरएफआयडी’ यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:51 PM2020-01-01T20:51:34+5:302020-01-01T20:51:54+5:30
ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे. तसेच याला जीपीएस सिस्टिमही बसविण्यात आली असून,
सांगली : जिल्हा पोलीस दलाने महापालिका क्षेत्रातील पेट्रोलिंगमध्ये वाढ करून त्याला शिस्त आणण्यासाठी अत्याधुनिक ‘आरएफआयडी’ ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यासाठी ३०० हून अधिक ठिकाणे निश्चित केली आहेत. पोलिसांची पेट्रोलिंग करताना आॅनलाईन हजेरीही घेतली जाणार आहे. या माध्यमातून गुन्हेगारांना पायबंद घालण्यात यश येईल, असे मत जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
शर्मा म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील कॉलनी, गृहनिर्माण सोसायटीत आरएफआयडी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे पोलीस कर्मचाºयांना रात्रीची गस्त बंधनकारक झाली आहे.
पेट्रोलिंगला जाण्यापूर्वी पोलीस कर्मचाºयाला ‘आरएफआयडी’द्वारे स्वत:चा अंगठा टेकवून गस्तीला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे.
तसेच याला जीपीएस सिस्टिमही बसविण्यात आली असून, पोलीस कर्मचारी कोणत्या ठिकाणी गस्तीवर आहे, हे समजणार आहे. प्रत्येक गस्ती पथकातील कर्मचाºयास वीस पॉर्इंट देण्यात आले असून, रात्रीच्यावेळी संबंधित ठिकाणी कर्मचारी पोहोचले की नाही, हे समजणार आहे. ही यंत्रणा शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.