मंत्र्यांच्या दौऱ्यात आता नोडल अधिकाऱ्याची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:28 AM2021-07-27T04:28:34+5:302021-07-27T04:28:34+5:30

सांगली : सांगलीसह राज्यातील नऊ जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पाहणीसाठी आता मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षासह केंद्रातील ...

Now the presence of the nodal officer in the ministerial tour | मंत्र्यांच्या दौऱ्यात आता नोडल अधिकाऱ्याची उपस्थिती

मंत्र्यांच्या दौऱ्यात आता नोडल अधिकाऱ्याची उपस्थिती

Next

सांगली : सांगलीसह राज्यातील नऊ जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पाहणीसाठी आता मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षासह केंद्रातील मंत्रीही आता दौरे करत आहेत. पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील असणार आहेच पण, जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांचे काम करण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक असल्याने, यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांऐवजी नोडल अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीत दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगलीत याबाबत माहिती दिली.

पवार म्हणाले, पूरस्थिती नियंत्रणात आल्याने मंत्री व नेत्यांचे या भागातील दौरे वाढणार आहेत. मुळात अचानक आलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांना वेळ देऊन काम करावे लागणार आहे. हे अधिकारी मंत्री, नेत्यांच्या दौऱ्यातच व्यस्त राहिल्यास उपाययोजना करण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात नोडल अधिकारी उपस्थित राहतील तर, जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून आपले काम करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना जावेच लागते. त्यात आता उद्यापासून आणखी दौरे वाढणार आहेत. त्यामुळे नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवली आहे. नाही तर प्रत्येकजण इथे येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला असे म्हणत बसतील.

Web Title: Now the presence of the nodal officer in the ministerial tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.