कदमांच्या दौऱ्याने एनएसयुआयला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2016 11:28 PM2016-07-01T23:28:41+5:302016-07-01T23:36:28+5:30

काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न : आगामी निवडणुकांसाठी फिल्डिंग

NSUA's strength through step-by-step visits | कदमांच्या दौऱ्याने एनएसयुआयला बळ

कदमांच्या दौऱ्याने एनएसयुआयला बळ

Next

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या कवठेमहांकाळ दौऱ्याने कवठेमहांकाळ ‘एनएसयुआय’ला बळ मिळाले असून एनएसयुआयचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाले आहेत. काँग्रेस पक्ष बळकठीसाठी तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांनी तरुणांची फौज उभी करून विश्वजित कदम यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु केला.
तालुक्यात आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी नुकताच पक्षाकडे तरुणांचा ओढा वाढावा यासाठी दौरा केला. यावेळी त्यांनी कवठेमहांकाळ येथे एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना व अध्यक्ष विशाल शिंदे यांना ताकद देऊ, काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना न्याय देऊ, भविष्यात चांगली संधी देऊ, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
या तरुण कार्यकर्त्यांना आधार व ताकद, मार्गदर्शन देण्यासाठी विश्वजित कदम यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तसेच युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वैभव गुरव, विश्वजित यूथ फौंडेशनचे उदय शिंदे यांनीही या युवा कार्यकर्त्यांना मदत करावी व सहकार्य करावे, असे सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थांच्या प्रश्नावर मोर्चे, आंदोलने करुन, निवेदने देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले यांनी, विशाल शिंदे यांना बरोबर घेऊन गाववार बैठका घेण्याचे नियोजन केले असून कदम यांच्या आदेशामुळे एनएसयुआयच्या नेतृत्वाला व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडत तालुक्यात काँग्रेस पक्षवाढीसाठी कंबर कसली आहे. सोबतीला वैभव गुरव, उदय शिंदे यांनाही घेतले आहे.

Web Title: NSUA's strength through step-by-step visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.