जिल्ह्यात काेरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:59+5:302021-02-23T04:39:59+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढ-उतार रविवारी कायम होता. शनिवारी एकाच दिवशी २८ जणांना कोरोनाचे निदान झाले असताना, रविवारी ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढ-उतार रविवारी कायम होता. शनिवारी एकाच दिवशी २८ जणांना कोरोनाचे निदान झाले असताना, रविवारी त्यात घट होत १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कडेगाव तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच गेल्या चार दिवसात पुन्हा एकदा बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने घेतलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत ३५४ जणांच्या चाचणीतून ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ८३८ चाचण्यांमधून ८ जणांना निदान झाले आहे.
बाधित १३ रुग्णांपैकी १० रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यात टिंबर एरिया, विजयनगर, धामणी रोड, वखारभाग, गावभाग, विद्यानगर व शासकीय रुग्णालय परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.
चौकट
मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई
महापालिका क्षेत्रात पुन्हा कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. औषध फवारणीसह गर्दी टाळण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे.