बोरगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:02+5:302021-05-26T04:28:02+5:30
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे मंगळवारी कोरोनाचे १५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील एकाच कुटुंबातील आठजणांचा समावेश आहे. ...
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे मंगळवारी कोरोनाचे १५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील एकाच कुटुंबातील आठजणांचा समावेश आहे. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून गावात मोकाट फिरणाऱ्यांमुळे हे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन ही आता हतबल झाले आहे.
प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणता असताना नागरिक मात्र बेशिस्त पण राहाते आहे. कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अखेर दुसऱ्या लाटेत २९५ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील सध्या ॲक्टिव्ह रुग्ण १२५ असून बरे झालेले १८० रूग्ण आहेत. यात आज अखेर २३ जनांचा मृत्यु झाला आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे प्रशासन ही यापुढे हतबल झाले आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांचे संपर्कातील व्यक्ती बाहेर फिरत असल्यानेच कोरोनाला आवरणे अवघड होत आहे.
चौकट
कमांडो दाखल
गावातील बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कमांडोंना बोलाविले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना चोप दिला तर काहींना अंगठे धरून शिक्षा ही दिली. पळून जाण्यात बरेच जण सफलही झाले आहेत.