कोरोनाची रुग्णसंख्या ३६८ वर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:28+5:302021-04-07T04:28:28+5:30

सांगली : मंगळवारी (दि. ६) नव्याने ३६८ कोरोना रुग्ण जिल्ह्याभरात आढळले. उपचार घेत असलेल्या ३१४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

The number of corona patients reached 368 | कोरोनाची रुग्णसंख्या ३६८ वर पोहोचली

कोरोनाची रुग्णसंख्या ३६८ वर पोहोचली

Next

सांगली : मंगळवारी (दि. ६) नव्याने ३६८ कोरोना रुग्ण जिल्ह्याभरात आढळले. उपचार घेत असलेल्या ३१४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ९०४ झाली आहे, तर कोरोनाचे एकूण रुग्ण ५३ हजार ५०८ इतके झाले आहेत. ४८ हजार ७८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवरच्या मृतांची संख्या १८२२ वर पोहोचली आहे. मंगळवारी ग्रामीण भागात २१० कोरोना रुग्ण आढळले. महापालिका क्षेत्रात ही संख्या ९५ आहे.

मंगळवारी दिवसभरात ८९१ नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली, त्यातून १४४ अहवाल पॉझिटिव्ह आले. १३९१ रॅपिड ॲन्टिजन तपासण्यांमधून २३४ जण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. कडेगाव, खानापूर, मिरज, वाळवा तालुका व महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेल्यांपैकी २३ रुग्ण नॉन इन्व्हेजिव्ह व्हेन्टिलेटरवर आहेत. तिघे इन्व्हेजिव्ह व्हेन्टिलेटरवर तर १९ रुग्ण हायफ्लो नोझल ऑक्सिजनवर आहेत.

रुग्ण असे : सांगली शहर ६४, मिरज शहर ३१, आटपाडी ३९, कडेगाव २९, खानापूर २९, पलूस १८, तासगाव १३, जत ३३, कवठेमहांकाळ ८, मिरज तालुका २८, शिराळा ३४, वाळवा ४२.

चौकट

मिरज कोविड रुग्णालयात १९३ रुग्ण

मिरज कोविड रुग्णालयात सध्या १९३ रुग्ण उपचार घेत आहेत. भारतीमध्ये ७८, मिरज चेस्टमध्ये ४४ तर सिनर्जीमध्ये ७१ रुग्ण आहेत. खासगी व शासकीय कोरोना केंद्रात एकूण ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात ८७ रुग्ण आहेत. २ हजार १८३ रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत.

Web Title: The number of corona patients reached 368

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.