वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:50+5:302021-05-12T04:27:50+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात आज अखेर १० हजार ६२० व्यक्ती कोरोनाबाधीत ...

The number of corona patients in Valva taluka has crossed 10,000 | वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजार पार

वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजार पार

Next

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात आज अखेर १० हजार ६२० व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्या. त्यातील ७ हजार ९३० रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ७५.११ टक्के इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण हे ३.८० टक्के इतके आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी गेल्या वर्षभराच्या काळातील कोरोना संसर्गाची तपशीलवार माहिती दिली. त्यामध्ये ग्रामीण भागातील ७ हजार ३१ रुग्णांची नोंद झाली आहे. हेच प्रमाण इस्लामपूर आणि आष्टा या शहरी भागात ३ हजार ३६५ इतक्या रुग्ण नोंदीचे राहिले. आज अखेर तालुक्यात २ हजार २८४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यातील १६९४ रुग्ण ग्रामीण भागातून तर ५९० रुग्ण शहरी भागातून आहेत. आतापर्यंत ग्रामीणमधून २७९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये १२४ रुग्ण दगावले आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. असे एकूण ४०६ रुग्ण आतापर्यंत दगावले आहेत.

डॉ. पाटील म्हणाले, तालुक्यातील विविध रुग्णालयात ५७९ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर १६९२ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. तालुक्याच्या बाहेर १३ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात ४२ ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. ८७ हजार ८२८ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ९ हजार ७४२ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील ९७ हजार ५७० नागरिकांचे लसीकरण पूूर्ण झाले आहे.

Web Title: The number of corona patients in Valva taluka has crossed 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.