जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:26 AM2021-03-25T04:26:22+5:302021-03-25T04:26:22+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा बुधवारी पूर्ण केला. दिवसभरात १६३ जणांना कोरोनाचे निदान झाले. सांगली आणि ...

The number of corona victims in the district is 50,000 | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार पूर्ण

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार पूर्ण

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा बुधवारी पूर्ण केला. दिवसभरात १६३ जणांना कोरोनाचे निदान झाले. सांगली आणि मिरजेतील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६०, तर शिराळा तालुक्यात २४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी चिंता वाढविणारी ठरत आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६०, तर जिल्ह्यातही शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांत बाधितांची संख्या वाढत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत घेण्यात आलेल्या ९९८ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ११५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत; तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९१९ जणांच्या तपासणीतून ५४ जण बाधित आढळले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्या वाढतच असून सध्या १२२३ उपचार घेत असून त्यातील ८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७६ जण ऑक्सिजनवर, तर सातजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीनजणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

बाधितांचा ५० हजारांचा टप्पा पूर्ण

गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा कहर जिल्ह्याने अनुभवला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बाधितांची संख्या मर्यादित असताना पुन्हा एकदा बाधित वाढत आहेत. बुधवारी बाधितांच्या संख्येने ५० हजार पार करताना आता ५० हजार १६२ बाधित झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५०१६२

उपचार घेत असलेले १२२३

कोरोनामुक्त झालेले ४७१६१

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७७८

बुधवारी दिवसभरात

सांगली २७

मिरज ३३

शिराळा २४

मिरज तालुका १९

वाळवा १८

आटपाडी १२

कवठेमहांकाळ, खानापूर ७

तासगाव ६

जत ५

कडेगाव १

Web Title: The number of corona victims in the district is 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.