जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:57+5:302021-01-25T04:26:57+5:30
सांगली : जिल्ह्यातील काेरोना बाधितांच्या संख्येेने शनिवारी ४८ हजारांचा टप्पा पूर्ण केला. सध्या कोरोना स्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी ...
सांगली : जिल्ह्यातील काेरोना बाधितांच्या संख्येेने शनिवारी ४८ हजारांचा टप्पा पूर्ण केला. सध्या कोरोना स्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी दिवसात १५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर जत तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असतानाच शनिवारी ४८ हजारांची संख्या पार झाली. सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा आणि वाळवा तालुक्यात एकही नवा रूग्ण आढळलेला नाही.
जिल्ह्यातील पाच रूग्णालयात उपचार घेत असलेल्या १५६ रूग्णांपैकी ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २७ जण ऑक्सिजनवर तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲंटीजेनच्या ८८६ चाचण्यांमधून ६ जण बाधित आढळले आहेत.
चौकट
सांगली ०
मिरज १
आटपाडी १
जत ३
कडेगाव ७
कवठेमहांकाळ ०
खानापूर १
मिरज तालुका ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव २
वाळवा ०