जिल्ह्यात पाच वर्षांत गाई, बैलांच्या संख्येत १३ हजारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:36+5:302020-12-24T04:24:36+5:30

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनंतर जिल्ह्यातील पाळीव पशुंची गणना करण्यात येते. गतवर्षी झालेल्या पशुगणनेची आकडेवारी तयार झाली असून, ...

The number of cows and bullocks in the district has decreased by 13,000 in five years | जिल्ह्यात पाच वर्षांत गाई, बैलांच्या संख्येत १३ हजारांची घट

जिल्ह्यात पाच वर्षांत गाई, बैलांच्या संख्येत १३ हजारांची घट

Next

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनंतर जिल्ह्यातील पाळीव पशुंची गणना करण्यात येते. गतवर्षी झालेल्या पशुगणनेची आकडेवारी तयार झाली असून, जिल्ह्यात म्हैस, गाय, बैलांची संख्या सर्वाधिक ४ लाख ९३ हजार असून, त्यानंतर म्हैस व रेड्यांची संख्या ३ लाख २४ हजार आहे. २ लाख ७५४ शेळ्या व ४ लाख ५४ हजार बकरे आहेत. डुकरांची संख्या केवळ ३४१७, तर मोकाट व पाळीव कुत्री ६० हजार १३२ आहेत. यात महापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांची स्वतंत्र गणना झाली नाही. गेल्या पाच वर्षांत गाई व म्हैशींची संख्या १३ हजारांने घटली आहे. शेळ्या, मेंढ्यांच्या संख्येत २० हजाराने वाढ झाली आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव पशुंच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. साथ रोगांपासून बचावासाठी त्यांचे लसीकरण करण्यात येते. यामुळे जिल्ह्यातील पाळीव पशुंची संख्या कमी झाली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डाॅ. सदाशिव बेडक्याळे यांनी सांगितले. शेतीचे यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या कमी, तर उदरनिर्वाहासाठी शेळ्या, मेंढ्या पालन करण्यात येत असल्याने शेळ्या, मेंढ्यांची संख्या वाढत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

चाैकट

जिल्ह्यातील पशुसंख्या

आटपाडी

म्हैशी २३३०७

गाय-बैल ३११८३

शेळ्या ३१५९७

बकऱ्या ६३७३०

जत

म्हैशी ७००५८

गाय-बैल ७०९९६

शेळ्या ४५९६४

बकऱ्या १६२८७७

कडेगाव

म्हैशी १६७८६

गाय-बैल ३७०००

शेळ्या ३८६७

बकऱ्या २०४०१

खानापूर

म्हैशी १७७७२

गाय-बैल ३५१७७

शेळ्या ३३७७

बकऱ्या ३११२५

कवठेमहांकाळ

म्हैशी ३५५१५

गाय-बैल ३८२८३

शेळ्या १७२४४

बकऱ्या ४७६३५

मिरज

म्हैशी ३४८३६

गाय-बैल ५७३५५

शेळ्या ७१४७

बकऱ्या ३०७७२

पलूस

म्हैशी २००३९

गाय-बैल ३१९१३

शेळ्या १३९१

बकऱ्या १२७४९

शिराळा

म्हैशी २५६९७

गाय-बैल ४४३३६

शेळ्या १७४६

बकऱ्या ६८३५

तासगाव

म्हैशी २७७१९

गाय-बैल ५४४४४

शेळ्या ३३०७

बकऱ्या ३७९४१

वाळवा

म्हैशी ४५३७७

गाय-बैल ६८३५८

शेळ्या ७२०२

बकऱ्या १७२४७

Web Title: The number of cows and bullocks in the district has decreased by 13,000 in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.