गंभीर रुग्णांचे प्रमाण घटत चालले??????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:39 AM2020-12-14T04:39:13+5:302020-12-14T04:39:13+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर ओसरत जाऊन दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यातही आता बाधितांची संख्या आवाक्यात असून त्यातील ...

The number of critically ill patients is declining ?????????????? | गंभीर रुग्णांचे प्रमाण घटत चालले??????????????

गंभीर रुग्णांचे प्रमाण घटत चालले??????????????

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर ओसरत जाऊन दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यातही आता बाधितांची संख्या आवाक्यात असून त्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटत चालले आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा निम्म्यावर ऑक्सिजनचा वापर आला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या ३८५ रुग्णांपैकी ६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर ऑक्सिजनवर अथवा व्हेंटिलेटरवर उपचार केले जात आहेत.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहिला रुग्ण सापडला असला तरी, ऑगस्ट, सप्टेंबर महिने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची कसोटी पाहणारे ठरले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात गंभीर रुग्णांची संख्या हजाराच्या घरात होती, तर ऑक्सिजनची मागणी पुरवठ्यापेक्षा वाढली होती. सध्या मिरज कोविड रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयांत उपचाराची सोय आहे. शिवाय जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र, बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या घटत चालली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यात ४७ हजार २३२ बाधितांची संख्या आहे, तर ४५ हजार १२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५५ जण ऑक्सिजनवर, तर ५ जण हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. ८ गंभीर रुग्ण इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सध्या ६८ जण गंभीर होते, तर सप्टेंबर महिन्यात हीच संख्या १ हजार रुग्णांवर होती. त्यावेळी ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे सध्याची कोरोनाविषयक आकडेवारी दिलासा देणारी आहे.

Web Title: The number of critically ill patients is declining ??????????????

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.