आटपाडीत कोरोनाबरोबरच डेंग्यू रुग्णसंख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:07+5:302021-04-28T04:28:07+5:30
डेंग्यूबाबत ग्रामपंचायतीमार्फत आणि आरोग्य विभागाने जनजागरण मोहीम राबविली जात आहे, अशी माहिती सरपंच वृषाली पाटील यांनी दिली. ...
डेंग्यूबाबत ग्रामपंचायतीमार्फत आणि आरोग्य विभागाने जनजागरण मोहीम राबविली जात आहे, अशी माहिती सरपंच वृषाली पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या की, प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी भेटी देऊन न झाकलेल्या पाण्याचे बॅरेलमध्ये डेंग्यूच्या आळ्या तयार होत आहेत. आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने नागरिकांना दाखवून दिले आहे. ज्या बॅरेलमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या. ते सर्व बॅरेल प्रत्यक्ष लगेच ओतून द्यायला लावले.
डेंग्यूच्या अळी ही न झाकलेला पाण्यावर होत आहेत. घरातील पाणी उघडे ठेवू नये व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.
यावेळी ॲड.धनंजय पाटील, उपसरपंच प्रा.अंकुश कोळेकर, आरोग्यसेवक गणेश राक्षे, माणिक हाके, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, विजय पाटील, प्रकाश मरगळे, उमाकांत देशमुख, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, प्रसाद नलवडे उपस्थित होते.