जिल्ह्यातील कोराेनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:50 AM2021-02-28T04:50:55+5:302021-02-28T04:50:55+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ दिसून आली. गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक ३० जणांना कोरोनाचे निदान झाले ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ दिसून आली. गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक ३० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. दिवसभरात खानापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला असून, ८ जण कोरोनामुक्तही झाले आहेत.
शुक्रवारी बाधितांच्या संख्येत वाढ नोंदविल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच शनिवारी यात दुपटीने वाढ होत ३० जणांना कोरोनाचेे निदान झाले आहे. यात सर्वाधिक १२ रुग्ण तासगाव तालुक्यातील आहेत, तर ५ जण जत तालुक्यातील आहेत. महापालिका क्षेत्रात सांगली शहरात तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ६६० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ११८६ जणांच्या तपासणीतून १९ जणांना बाधा झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत आता १५७ उपचार घेत आहेत. त्यातील २५ जण ऑक्सिजनवर, तर ३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.