स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत केंद्रीय जीएसटी कार्यालयाला प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:57+5:302021-02-26T04:38:57+5:30
केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे सहायक आयुक्त किशोर गोहील यांनी स्वच्छ कार्यालयाचा पुरस्कार महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी ...
केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे सहायक आयुक्त किशोर गोहील यांनी स्वच्छ कार्यालयाचा पुरस्कार महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत केंद्रीय जीएसटी कार्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ उपक्रमांतर्गत स्वच्छ, सुंदर शासकीय कार्यालय स्पर्धेमध्ये या कार्यालयाने बाजी मारली. याबद्दल सांगली विभागाचे सहायक आयुक्त किशोर गोहील यांचा सत्कार आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, निरीक्षक महेंद्र सिंग, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे, संजय खोत, आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील विविध सरकारी कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जीएसटी कार्यालयातील स्वच्छता, पर्यावरणानुकूल व्यवस्थापन, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, आदी बाबी विचारात घेण्यात आल्या. आयुक्त कापडणीस म्हणाले की, शासकीय कार्यालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कार्यालयातील प्रत्येकाची आहे. सामूहिक जबाबदारीतून मिळालेल्या यशातून व पुरस्कारातून इतर कार्यालयांनाही प्रोत्साहन मिळते. स्वच्छ सरकारी कार्यालय शहराचे प्रतिबिंब ठरते.
गोहील म्हणाले की, कार्यालयातील सर्वांच्या एकजुटीमुळेच सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळविणे शक्य झाले. पुरस्कार मिळविण्याबरोबरच कार्यालयाचा परिसर स्वच्छ, आरोग्यदायी व आनंददायी ठेवण्याचा हेतू असतो. कोल्हापूरचे आयुक्त विद्याधर थेटे, संयुक्त आयुक्त राहुल गावंडे, वैशाली पतंगे, जी. सबरीश यांचेही सहकार्य मिळाले.
फोटो- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते स्वीकारताना केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त किशोर गोहील, सोबत निरीक्षक राजेंद्र मेढेकर, महेंद्र सिंग, संजय खोत, आदी.