जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली; ८२८ नवीन रुग्ण; १८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:49+5:302021-07-23T04:17:49+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी पुन्हा एकदा चांगलीच घट झाल्याने दिलासा मिळाला. दिवसभरात ८२८ नवे रुग्ण आढळून आले. ...

The number of patients in the district decreased; 828 new patients; 18 killed | जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली; ८२८ नवीन रुग्ण; १८ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली; ८२८ नवीन रुग्ण; १८ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी पुन्हा एकदा चांगलीच घट झाल्याने दिलासा मिळाला. दिवसभरात ८२८ नवे रुग्ण आढळून आले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १५ जणांचा मृत्यू झाला. ९१३ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे नवीन दोन रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील १५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली, कुपवाड प्रत्येकी १, मिरज तालुक्यातील ४, खानापूर तालुक्यातील ३, वाळवा, शिराळा तालुक्यात प्रत्येकी २, पलूस, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

गुरुवारी आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत ४५१३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३४६ बाधित आढळले, तर रॅपिड ॲंटिजनच्या ८९९९ जणांच्या चाचणीतून ४९४ जण पॉझिटिव्ह आढळले.

जिल्ह्यातील १००४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ८२६ जण ऑक्सिजनवर, तर १६९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला, तर नवे १२ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,६८,१२३

उपचार घेत असलेले ९८९१

कोरोनामुक्त झालेले १,५३,७७४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४४५८

पॉझिटिव्हिटी रेट ७.६०

गुरुवारी दिवसभरात

सांगली ९४

मिरज २४

आटपाडी ५७

कडेगाव ३३

खानापूर ११७

पलूस ४२

तासगाव ८६

जत ६४

कवठेमहांकाळ ५८

मिरज तालुका ९८

शिराळा २२

वाळवा १३३

Web Title: The number of patients in the district decreased; 828 new patients; 18 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.