कसबे डिग्रजला कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:44+5:302021-05-11T04:26:44+5:30
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे विशाल चौगुले युवा मंचच्या वतीने रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. ...
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे विशाल चौगुले युवा मंचच्या वतीने रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. यावेळी विशाल चौगुले, किरण पाटील, सचिन चौगुले आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे व्हावेत म्हणून पौष्टिक आहार व फळे वाटपाचा उपक्रम विशाल चौगुले युवा मंचने हाती घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
कसबे डिग्रजमध्ये ५० कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी अनेक जण गृहविलगीकरण आणि सोय नसलेल्यांना संस्था विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. त्यांची दररोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी शरद कुंवर, आरोग्य सेवक मनोज कोळी यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका कोरोना प्रतिबंध उपाययोजना करत आहेत.
रुग्णांची प्रतिक्रिया शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्या पुढाकाराने पौष्टिक आहार वाटप उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत कोरोनाच्या रुग्णांना दररोज अंडी, केळी वाटप करण्यात येणार आहे. विशाल चौगुले युवा मंचचे सचिन चौगुले, वैभव कुंभार, अभिजित चौगुले, प्रणव आपटे, विद्याधर समगे आदी कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहेत.