ओबीसी हक्क परिषदचे गावोगावी संघटन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:47+5:302021-09-23T04:29:47+5:30

फोटो : विटा येथे ओबीसी हक्क परिषदेच्या विटा शहराध्यक्षपदी अनिल साळुंखे यांची निवड झाल्यानंतर, त्यांचा संग्राम माने यांच्याहस्ते सत्कार ...

The OBC Rights Council will be organized from village to village | ओबीसी हक्क परिषदचे गावोगावी संघटन करणार

ओबीसी हक्क परिषदचे गावोगावी संघटन करणार

Next

फोटो : विटा येथे ओबीसी हक्क परिषदेच्या विटा शहराध्यक्षपदी अनिल साळुंखे यांची निवड झाल्यानंतर, त्यांचा संग्राम माने यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी गावपातळीवर ओबीसी हक्क परिषदेमार्फत संघटन मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने यांनी केले.

विटा येथे ओबीसी हक्क परिषदेची बैठक संग्राम माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत ओबीसी हक्क परिषदेची विटा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विटा शहराध्यक्षपदी अनिल साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी नीलेश लाटणे, उपाध्यक्षपदी मंगेश चौगुले, सचिवपदी संताजी मेटकरी व सेक्रेटरीपदी मनोज कदम यांची, तर सल्लागार म्हणून भीमराव काशिद व सावंत यांची निवड करण्यात आली.

यावेळी ओबीसी हक्क परिषदेचे झहीर मुलाणी, गजानन गायकवाड, कृष्णा कुऱ्हाडे, पुरुषोत्तम दिवटे, संजय चोथे, सचिन कुंभार, मोहन वेळापुरे, शकील तांबोळी, पराग साळुंखे, प्रफुल्ल साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The OBC Rights Council will be organized from village to village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.