गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:06 PM2019-08-30T15:06:45+5:302019-08-30T15:08:02+5:30

सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश जारी केला आहे.

On the occasion of Ganeshotsav, prohibition orders were issued in Sangli and Mirage cities | गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारीआदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कारवाई

सांगली : सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश जारी केला आहे.

सांगली जिल्ह्यात दिनांक 2 ते 12 सप्टेंबर 2019 अखेर गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे व गणेश विसर्जन मिरवणूका पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरात बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरुष गर्दी करीत असतात. नागरीकांना व्यवस्थीत देखावे व विसर्जन मिरवणूका पाहता याव्यात तसेच कोणतेही वाहन गर्दीत घुसुन नागरीकांच्या जिवीतास धोका पोहोचू नये याकरिता मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

सांगली शहरातील मार्ग

सांगली शहरात दिनांक 6, 8 व 10 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 2 ते रात्री 12 या वेळेत तसेच दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीेचे दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजीचे रात्री 12 या वेळेत, टिळक चौक ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर ते मारुती चौकाकडे जाणारा रस्ता व बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते टेलीफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगांव रोड ते बायपास कडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी ते तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली ते झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय ते आनंद टॉकीजकडे जाणारा रस्ता, कामगार भवन ते आमराईकडे जाणारा रस्ता, देशपांडे बिल्डींग (वखारभाग) ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता व वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते या मार्गावर उपरोक्त कालावधीसाठी मनाई आदेश लागू राहील.

 मिरज शहरातील मार्ग

 मिरज शहरात दिनांक 10 सप्टेंबर 2019 रोजीचे 9 वाजल्यापासून ते 11 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजेपर्यंत व दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजल्यापासून ते 13 सप्टेंबर 2019 रोजीचे 15.00 वाजेपर्यंत, श्रीकांत चौक ते श्रीकांत चौकात येणारे रस्ते, स्टेशन चौक ते मिरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता, हिरा हॉटेल ते मिरज शहर पोलीस ठाणेकडून जाणारा रस्ता, फुलारी कॉर्नर ते फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व रस्ते, बॉम्बे बेकरी ते बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते, किसान चौक ते श्रीेकांत चौक व पोलीस ठाणे कडे जाणारा रस्ता, दत्त चौक ते श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक ते किसान चौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक ते पाटील हौदाकडून भोसले चौकोकडे जाणारा रस्ता, झारी मस्जिद कॉर्नर ते बॉम्बे बेकरीकडे जाणारा रस्ता व श्रीकांत चौक ते गणेश तलाव

पर्यायी वाहतूक, गणपती विसर्जन मार्ग व पार्किंग व्यवस्था

सांगली शहर येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - मिरजकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल-झुलेलाल चौक-पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील), इस्लामपूरकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - इस्लामपूर टोलनाका-बायपास-कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी-पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकारनगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). तासगाव, विटा कडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).

सांगली शहर गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग - विश्रामबाग चौकाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - विश्रामबाग - पुष्पराज चौक - राममंदिर - काँग्रेस भवन - कामगार भवन - स्टेशन चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट. रिसाला रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - रिसाला रोड - शिवाजी पुतळा - मारूती चौक - गारमेंट सेंटर चौक - बालाजी चौक येथून वेगवेगळे मार्ग, बालाजी चौक - करमरकर चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट, बालाजी चौक - झांशी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. टिंबर एरियाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - कॉलेज कॉर्नर - सांगली हायस्कूल - पुष्पराज चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. गणपती विसर्जन झालेल्या मंडळाचा परतीचा मार्ग - टिळक चौक - हरभट रोड - गारमेंट सेंटर चौक मार्गे.

सांगली शहर पार्किंग व्यवस्था - जनावर बाजार (टिळक मार्ग) - इस्लामपूर व सांगलीकडून येणाऱ्या वाहनांच्यासाठी, जूनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) - चारचाकी वाहनांसाठी (पे पार्कींग), शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे (भावे नाट्यगृहालगत) - दूचाकी व चारचाकी वाहनांसाठी, वैरण बाजार (तरूण भारत स्टेडियम समोर) - कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी, राजवाडा पटांगण - पलूस नांद्रेकडून येणाऱ्या वाहनांसाठी, कोर्ट आवार - दूचाकी वाहनांसाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम - तासगाव किंवा मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पीटल - तासगावकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम - दूचाकी पार्किंगसाठी, सांगली हायस्कूल सांगली (आमराईजवळ) -टिंबर एरियाकडून येणाऱ्या दूचाकी वाहनांसाठी, कर्नाळ पोलीस चौकीच्या मागील पटांगण (जामवाडी) - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, पटेल चौक क्रीडा मंडळ - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी.

मिरज येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - सोलापूरकडून म्हैशाळकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी-तासगाव फाटा-सुभाषनगर-विजयनगर मार्गे-म्हैशाळ/कागवाड, म्हैशाळ व कर्नाटककडून पंढरपूर सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - म्हैशाळ- विजयनगर - सुभाषनगर - तासगाव फाटा - पंढरपूर, सोलापूर. सोलापूर, पंढरपूरहून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - पंढरपूर रोड, गांधी चौक, वंटमुरे कॉर्नर, विजयनगर, विश्रामबाग, धामणी, अंकली, कोल्हापूरकडे जातील.

कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरकडे जाणारी वाहने - अंकली फाटा, धामणी, विश्रामबाग, विजयनगर, वंटमुरे कॉर्नर, गांधी चौक, पंढरपूर, सोलापूरकडे जातील. कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने - म्हैशाळ, शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, रेल्वे ब्रीज मार्गे कोल्हापूरकडे जातील. कोल्हापूरकडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने - अंकली फाटा, रेल्वे ब्रीज, महात्मा फुले चौक, शास्त्री चौक, म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील. कृष्णाघाट मार्गे शिरोळ

Web Title: On the occasion of Ganeshotsav, prohibition orders were issued in Sangli and Mirage cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.