उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 10, 2017 10:41 PM2017-02-10T22:41:31+5:302017-02-10T22:41:31+5:30
स्वच्छ भारत अभियान : देवळा तालक्यात गुडमॉर्निंग पथकाची कारवाई
अशोक पाटील --इस्लामपूर --गेल्या ३0 वर्षात सत्ताधारी राष्ट्रवादीने निकृष्ट कामाचे शहरवासीयांना दर्शन घडविले आहे. विकास कामांतील काही कामे भकास झाली आहेत. म्हणूनच मतदारांनी सत्ताबदल केला आहे. स्वच्छतेसाठी ठेकेदारही बदलण्यात आला आहे. परंतु अजूनही स्वच्छतेची परिस्थिती जैसे थे आहे. स्वच्छतेवर पालिका प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते. मग हा निधी जातो कुठे? हे शोधण्याचे आव्हान नूतन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना आहे.
पालिकेत सत्ताधारी विकास आघाडी येऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. शहराचा चेहरा—मोहरा बदलण्याचे आश्वासन विकास आघाडीने प्रचार सभांतून दिले होते. शिक्षण विभाग सोडला, तर सर्व विभाग राष्ट्रवादीकडे आहेत. परंतु जनतेतून निवडून गेलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासमोर मात्र सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे मोठे आव्हान आहे. त्यातच विकास आघाडीचे पक्षप्रतोद आणि गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी स्वच्छतेवर आवाज उठवून विकास आघाडीलाच घरचा आहेर दिला आहे.
तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने भुयारी गटार योजनेची घोषणा केली होती. पण ती फक्त कागदावरच राहिली आहे. उपनगरांत बांधलेल्या गटारी जवळजवळ ढासळलेल्या आहेत. शहरातील बेकायदा बांधकामांमुळे काही ठिकाणी वाहणाऱ्या गटारीतील पाणी निघून जाण्यासाठी पुढे गटारीच नाहीत. त्यामुळे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होऊन दुर्गंधी निर्माण झाली आहे.
स्वच्छता आणि कीटकनाशक फवारणीचा ठेका विभागून देण्यात आला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी राष्ट्रवादीने कीटकनाशक औषध खरेदीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केला होता. त्याचे पुढे काय झाले? की विरोधक मॅनेज झाले? हे काहीच समजले नाही. याचाही शोध घेण्याची वेळ नूतन नगराध्यक्षांवर येऊन ठेपली आहे.
निशिकांत पाटील हे आमदार जयंत पाटील यांचे चेले आहेत. परंतु ते सध्या विरोधात काम करत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी राष्ट्रवादीने पालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यासह इतरही घोषणा मते पदरात पाडून घेण्यासाठी केल्या होत्या. परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. केवळ ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हाच काय तो उपक्रम त्यांच्याकडून राबवला जात आहे. या भेटीनंतरही किती कामे मार्गी लागली, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे.
एकंदरीत गेल्या ३0 वर्षात पालिकेतील अनागोंदी कारभाराचा नारळ पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या नावाने फोडला जात होता. आता विकास आघाडीसह विरोधी राष्ट्रवादीमध्ये निर्णय घेणाऱ्या नेत्यांची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या ठेकेदाराकडून बाजूला काढलेला टक्का नेमका कोणा-कोणाकडे जातो, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
पालिकेत सत्ताबदल : अस्वच्छता कायम
याबाबत विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक विक्रम पाटील म्हणाले, शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षाला ४ कोटी ७६ लाखांचा निधी खर्ची टाकला जातो. पण या खर्चाच्या मानाने शहरातील स्वच्छता होताना दिसत नाही. सध्या पालिकेत सत्ताबदल झाला असला तरी, पूर्वीप्रमाणेच अस्वच्छता दिसत आहे. ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या भरुन वाहत आहेत. गटारींची स्वच्छता वेळेवर होत नाही. डुकरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील बेकायदा बांधकामामुळे वाहणाऱ्या गटारातील पाणी निघून जाण्यासाठी पुढे गटारीच नाहीत. त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे व डासांचे साम्राज्य पसरले आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी.
इस्लामपूर शहरातील अनेक ठिकाणचा कचरा उठाव झाला नसल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.