अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला पाणी बचतीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:20+5:302021-03-23T04:28:20+5:30
सांगली : जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी बचत व पाण्याचा विवेकी ...
सांगली : जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची जलशपथ सोमवारी घेतली. जिल्ह्यात दि. २७ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, असेही कोरे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सभापती प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, आशा पाटील, सुनीता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, तानाजी लोखंडे, विजयसिंह जाधव, कार्यकारी अभियंता दादा सोनवणे, सदस्य संजीव पाटील, नितीन नवले आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प व्यवस्थापक विकास पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दिलीप मस्के, सतीश जाधव, सुहास गवळी, दीपक वेदपाठक यांनी परिश्रम घेतले.
चौकट
यंत्रणा सक्षम करणार : जितेंद्र डुडी
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, जिल्हा परिषदेचे शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता हे महत्त्वाकांक्षी विषय डोळ्यासमोर ठेवून काम केले जात आहे. आरोग्य केंद्रे सक्षम केली जात आहेत. शाळा हायटेक होत असून अपूर्ण पाणी योजना पूर्ण केल्या जात आहेत.