चाकूच्या धाकाने भरदिवसा वृद्ध महिला डॉक्टरला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:59+5:302021-09-08T04:32:59+5:30

सांगली : येथील हाॅटेल सदानंदजवळील घरात घुसून तीन चोरट्यांनी वृद्ध महिला डाॅक्टरला धारदार चाकूचा धाक दाखवत साडेसहा लाखांचा ऐवज ...

The old woman robbed the doctor all day with a knife | चाकूच्या धाकाने भरदिवसा वृद्ध महिला डॉक्टरला लुटले

चाकूच्या धाकाने भरदिवसा वृद्ध महिला डॉक्टरला लुटले

Next

सांगली : येथील हाॅटेल सदानंदजवळील घरात घुसून तीन चोरट्यांनी वृद्ध महिला डाॅक्टरला धारदार चाकूचा धाक दाखवत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे.

नलिनी महारुद्र नाडकर्णी (वय ८७, रा. नाडकर्णी हाॅस्पिटल, गीता दर्शन, हाॅटेल सदानंदजवळ) यांनी फिर्याद दिली. नाडकर्णी एमडी डाॅक्टर आहेत. त्या नाडकर्णी हाॅस्पिटलजवळील घरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा शिवानंद कुटुंबासह वारणाली येथे राहतो. वयोमानामुळे सध्या त्या वैद्यकीय व्यवसाय करीत नाहीत. रविवारी दुपारी त्या घरात एकट्याच असताना दाराची बेल वाजली. त्या मुख्य दरवाजाजवळ आल्या असता एक मुलगा बाहेर दिसला. त्याने उपचारासाठी आल्याचे सांगितले. नाडकर्णी यांनी हाॅस्पिटल बंद असल्याचे सांगितले. तो लोखंडी गेट बंद न करताच गेल्याने नाडकर्णी गेट बंद करण्यासाठी बाहेर आल्या. तेव्हा दोन चोरट्यांनी त्यांना पकडले. त्यांना घराच्या हाॅलमध्ये आणताना तिसरा चोरटाही घरात शिरला. एकाने त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून कपाटाच्या चाव्या मागितल्या. नाडकर्णी यांनी चाव्या मुलाकडे असल्याचे सांगितले. चोरट्यांनी त्यांना बेडरूममध्ये आणले. त्यांच्याकडील हत्याराने लोखंडी कपाट उचकटून त्यातील कोल्हापुरी साज, मोहनमाळ, सोन्याचे मनगटी घड्याळ, सोन्याचा कंडा, दोन साखळ्या, कानातील रिंग, अंगठी, पेंडल, पिरोजा सेट, गळ्यातील हार, मोबाईल व रोख ४० हजार रुपये असा ६ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज पळवला. याप्रकरणी नाडकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The old woman robbed the doctor all day with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.