स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर फेकले मेलेले मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 11:47 PM2023-03-10T23:47:43+5:302023-03-10T23:47:53+5:30

या मृत माशामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालेली असून याचा फटका जयसिंगपूर शहरासह मिरज अंकली व शिरोळ तालुक्यांतील वीस हून अधिक गावांना बसणार आहे.

On behalf of the Swabhimani Shetkar Sangathan, the dead fish were thrown at the residence of the Sangli Municipal Commissioner | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर फेकले मेलेले मासे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर फेकले मेलेले मासे

googlenewsNext

सांगली : गेल्या दोन दिवसापासून सांगली महापालिकेच्या शेरीनाल्यातून व वसंतदादा साखर कारखान्यामधून मळीमिश्रीत व प्रदुषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीत मेलेल्या माशांचा खच पडला आहे. यामुळे हरिपूर संगमापासून ते नृसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदीत मासे तरंगू लागले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त याच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री मृत मासे फेकले. 

या मृत माशामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालेली असून याचा फटका जयसिंगपूर शहरासह मिरज अंकली व शिरोळ तालुक्यांतील वीस हून अधिक गावांना बसणार आहे. प्रदुषण विभागाचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याप्रकरणी मुग गिळून गप्प आहेत. 

रात्री १० वाजता स्वाभिमानीचे जवळपास १० ते १५ कार्यकर्ते आयुक्त यांच्या निवासस्थानी येवून घोषणा देत त्यांच्या निवासस्थानावर जवळपास चार ते पाच पोती मासे फेकले आहेत. यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून गनिमी काव्याने येत्या दोन दिवसात प्रदुषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: On behalf of the Swabhimani Shetkar Sangathan, the dead fish were thrown at the residence of the Sangli Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली