चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

By अशोक डोंबाळे | Published: June 24, 2023 03:43 PM2023-06-24T15:43:19+5:302023-06-24T15:43:46+5:30

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार

On the occasion of Ashadhi Ekadashi 280 extra buses will run from Sangli to Pandharpur | चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

googlenewsNext

सांगली : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील दहा एसटी आगांरातून २८० जादा बसेस सोडण्याचे नियोजन झाले आहे. वारीच्या कालावधीत ८६ लाख ८२ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात. यापूर्वी दिंड्यांमधून अनेकजण रवाना झाले असून, अजूनही आपापल्या नियोजनानुसार जात आहेत. एकादशीच्या दोन ते तीन दिवस आधी वारकऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून २८० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

असे आहे नियोजन

आगार -     बसफेऱ्या - मिळणारे उत्पन्न
सांगली          ३८              ५६८५०६
मिरज            ३२              ६४४२८९
इस्लामपूर     २९              ८२११०७
तासगाव        २९             १४५२८२४
विटा              २८             ६५७४१२
जत               २८             ८४५२९२
आटपाडी      २९             ९९३७००
क.महांकाळ  २५            ६१३५५८
शिराळा          २२           ६६७५११
पलूस             १८            १४१८५८१
एकूण            २८०          ८६८२७८०

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार

एसटीने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास उपलब्ध करून दिला असून, ६० वर्षांवरील नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो. भरीव सवलत देण्यात येत असल्याने वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी वर्तवली.

२५ जून ते ४ जुलैपर्यंत जादा बसेस

२९ जूनरोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे २५ जून ते ४ जुलैपर्यंत पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. आवश्यक तेवढ्या प्रवाशांची भरती होताच बस पंढरपूरकडे रवाना करण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

Web Title: On the occasion of Ashadhi Ekadashi 280 extra buses will run from Sangli to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.